राजावाडी
हॉस्पिटलमध्ये
अपघातातील
जखमी
पेशंटची
योग्य
काळजी
न
घेतल्याच्या
विरोधात
मनसे
आ
.
राम
कदम
यांनी
जाहीर
पोस्टरबाजीकरून
तोडफोड
धरणेसाठी
आवाहन
केल्याप्रकरणी
घाटकोपर
येथील
पतंगनगर
पोलीस
ठाण्यात
त्यांच्यावर
गुन्हा
दाखल
करण्यात
आला
आहे
.
भटवाडीमध्ये ६ एप्रिल रोजी कारने १७ निष्पाप लोकांना उडविले . त्यांना उपचाराकरता राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . परंतु जखमींवर तेथे योग्य उपचार करण्यात आले नाही . तसेच हॉस्पिटल प्रशासनाने जखमींना दिलेली वागणूक अतिशय निराशाजनक आहे अशी तक्रार राम कदम यांनी केली आहे . तसेच पोस्टरवर हे हॉस्पिटलप्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी चक्क ‘ राजावाडी तोडफोड धरणे ’ जाहीर करून लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे .
रविवारपासून हे प्रक्षोभक पोस्टर शहराच्या विविध भागात झळकत असूनही कारवाई का होत नाही , असा सवाल वृत्तपत्रांतून विचारण्यात आल्यानंतर आज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान , मनसे कार्यकर्ते आणि राम कदम यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलसमोर आंदोलनास सुरुवात केली आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा