मुंबई - राज्यभरातील एकूण 15 लाख रिक्षाचालक व मालक रविवारी (ता. 15)
मध्यरात्रीपासून राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहेत. इंधनामध्ये झालेली
दरवाढ, तसेच महागाई निर्देशांकानुसार रिक्षाची भाडेवाढ मिळावी, अशा मागण्या
रिक्षाचालकांच्या असल्याची माहिती ऑटोरिक्षा चालक-मालक कृती समितीतर्फे
शरद राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. रिक्षा संपासाठी
आक्रमक पवित्रा घेत नियोजित संप हा अटळ असल्याचाही राव यांनी इशारा दिला
आहे.
आठवडाभरात रिक्षाचालकांनी ठरविलेले भाडेपत्रक परिवहन विभागाला देण्यात येणार आहे. त्यानुसारच भाडेवाढ द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. ऑटोरिक्षा भाडेवाढीसाठी वेगळे सूत्र मांडण्यात यावे, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च आणि महागाई निर्देशांकाचा ताळमेळ घालण्याचाही विचार करण्यात यावा, अशीही मागणी आहे. रिक्षाभाड्यात पहिल्या 1.6 किलोमीटरसाठी किमान 16 रुपये, तर नंतरच्या टप्प्यासाठी 9 रुपयांची भाडेवाढ संघटनेला अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा