आज बसलेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ रिस्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपानंतर समुद्रात उंच लाटा उसळल्या मात्र, त्यांची उंची मागील वर्षी आलेल्या सुनामी ऐवढी नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. अद्याप जीवत वा वित्त हानीची कोणतीही माहीत मिळालेली नाही.
फुकुशीमा येथील अणुऊर्जा प्रकल्प आणि ओनागावा अणु प्रकल्पाला कोणतेही नुकसान झालेले नाही.
मागील वर्षी याच महिन्याच्या ११ तारखेला जपान भूकंपाने हादरले होते. भूकंपानंतर आलेल्या सुनामीमुळे १९ हजार लोकांना प्राणास मुकावे लागले होते तर, अनेक लोक जखमी झाले होते. मागील वर्षी आलेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ एवढी होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा