'डूडल सोशल अड फेस्टिवल २०१४' चा उद्घाटन सोहळा
मुंबई / प्रतिनिधी:
समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना, प्रसंग त्याचबरोबर सामाजिक समस्या, प्रश्न आपल्या कलाकृतीद्वारे सादर करून,सृजनशील जाहिराती (प्रिंट अड्स) व जाहिरातपट (अड फिल्म्स) निर्माण करणाऱ्या विध्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांसाठी 'डूडल सोशल अड फेस्टिवल २०१४', हे विशेष व्यासपीठ 'मंथन आर्ट स्कूल' या संस्थेद्वारे निर्माण करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्कंठा वाढवलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जाहिरात क्षेत्रातले दिग्गज व 'पॉप्स' या नावाने ओळखले जाणारे श्री. केव्हि. श्रीधर (चीफ क्रियेटीव्ह ऑफिसर इंडिया सब कॉनटीनंट-लिओ बर्नेट) यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रत्नाकर मतकरी (मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक) आणि श्री. विक्रम गायकवाड (को फौन्डर अंडरडॉग कम्युनिकेशनस) हे उपस्थित होते. हा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिरच्या पु. ल. देशपांडे अकादमीत आर्ट ग्यालरी हॉलमध्ये २२ फेब्रुवारी पासून २ मार्च पर्यंत घेण्यात येणार आहे.नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार, बालमजुरी, महिला अत्याचार, वाढती महागाई यासारख्या सामाजिक समस्यांवर कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन देश पातळीवर करण्यात आले आहे. देशातील पहिला सोशल अड फेस्टिवल असणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातून तब्बल ४९० प्रिंट अड व अड फिल्म्सनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये १३१ अड एजेन्सीज त्याचबरोबर मुंबई, पुणे सहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून दिल्ली, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, केरळ, विशाखापटनम तर विदेशातून इंग्लंड व फिलिपाईन्स येथून या महोत्सवाला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे या महोत्सवाची रंगत आणखी वाढली आहे.
जाहिरात क्षेत्रातील दिग्गजांच्या परीक्षणातून निवड झालेल्या जाहिरातींचे सर्वांसाठी खुले प्रदर्शन या महोत्सवात मांडण्यात आले आहे. त्याचा सर्वसामान्य प्रेक्षकांना आस्वाद घेता येईल. सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या आपल्या कलाकृतीतून सादर करून प्रभावी सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनात मांडलेल्या भित्तीचित्रातून दिसेल.विजेत्यांना रोख रकमेसहित सुवर्ण, रौप्य व कास्य पारितोषीक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. यावेळी 'कॉर्पोरेट आयडेंटीटी', 'इज युवर एक्स्पीरीयन्स डिझाइन द नेक्स्ट बिग थिंग', 'क्रियेटीव्ह कॉपी रायटिंग', 'क्रियेटीव्हीटी इन अडव्हरटायझींग' या विषयांवर राजेश कुलकर्णी, सौरभ चांदेकर, रायोमंड पटेल, सौरभ करंदीकर या तज्ञांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी या क्षेत्रातील नवोदितांना व व्यावसायिक कलाकारांना लाभणार आहे.बक्षीस सभारंभ श्री.केव्हि. श्रीधर, श्री.गोपी कुकडे (अड गुरु) व श्री.संजय खरे (व्हाइस प्रेसिडेंट-पिनस्टोर्म) यांच्या हस्ते रविवार दिनांक २ मार्च रोजी होईल.चित्रपट व अडव्हरटायझींग क्षेत्रातील नामवंताची उपस्थितीहि यावेळी असेल. अशी माहिती 'मंथन आर्ट स्कूल' संस्थेचे संस्थापक प्रा.शशीकांत गवळी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा