मालाड
च्या विद्यार्थ्यांसाठी
"ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले अभ्यासिका"
मालाड
पूर्वच्या कुरार गावातील
मंगेश विद्या मंदिर शाळेत
"ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले "
अभ्यासिका
१० फेब्रुवारी पासून संध्याकाळी
७ ते ९.३०
या वेळेत सुरु होणार आहे.
शाळेतील
मुख्याध्यापक,
शिक्षक,
पालक,
शाळेचे माजी
विद्यार्थी तसेच स्थानिक
ज्येष्ठ नागरिक यांच्या
उपस्थितीत सोमवारी संध्याकाळी
६ वाजता विद्यार्थ्यांसाठी
स्व-अध्ययन
व्यासपीठ खुले होणार आहे.
विभागातील
सर्व शाळा महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत
मोफत प्रवेश दिला जाईल.
कुरार गावात अधिका-अधिक चाळ वस्ती आहे. लहान खोल्या, परिसरातील गजबज तसेच संध्याकाळचे टिव्ही कार्यक्रम अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात एकांत मिळत नाही. सध्या १०-१२वी तसेच १५वी साठी हा परिक्षेचा कालावधी आहे म्हणून मंगेश विश्वस्त मंडळाच्या संमतीने शांत वातावरण असलेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
मंगेश विद्या मंदिर- माजी विद्यार्थी संघ, स्थानिक ज्येष्ठ नागरिक व पालक असे सर्वजण आपापल्या परीने "पर्यवेक्षक" म्हणून विशेष सहभाग देणार आहेत. कुरारच्या पोलिस अधिकाऱ्यांनी अभ्यासिका उपक्रमाचे विशेष कौतुक करत त्यात विशेष सहकार्यरूपी पाठिंबा दिला आहे. अभ्यासिकेची प्रवेश प्रक्रिया दर रविवारी असेल. मालाड-गोरेगाव-कांदिवली च्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा